कांदा भजी...!
कांदा भजी...!
1 min
411
कांदा भजी असावी
ताजी ताजी गरमा गरम
सोबतीला तळलेली
मिरची नरम नरम
ताज्या भाजीचा
ताजा ताजा वास
बोलावतो नेहमी
घेण्या एक खास
मित्रा सोबत असता
प्लेटचा विचार मनात
हळूच सांगतो आपण
पैसे नाहीत हे कानात
मित्र प्रेम ते
ओसंडून वाहते
चिंता नाही भावा
बंधू प्रेम सांगते
अशी दोस्ती गड्या
कोल्हापूरतच भेटते
भजीच्या गाडीवर
ती नित्य दिसतें
नाहीतर पुण्याची ती
हाफ प्लेटची वेगळीच तऱ्हा
टी टी एम एम ची
शक्कल लढवतो पुणेरी खरा
गड्या आपला गावच बरा
इथेच भजीचा स्वाद खरा
नाहीतर दुसरे ठिकाणी
खिस्यात पैसे असून उपाशी मरा....!
