कामवाली बाई
कामवाली बाई
1 min
1.0K
आपण म्हणतो तिला, कामवाली बाई
पोट भरण्या कष्टते लेकरांची आई... ॥धृ॥
सकाळी नऊलाच बरोबर हजर
खाली मान घालून कामावर नजर
काम करून परतायची तिला घाई... ॥१॥
कपडे, भांडी, केर काढणे तिचे काम
सर्व करूनही येत नाही तिला घाम
मायेने लेकरांना सांभाळते ती दाई... ॥२॥
तिला करूया आपण प्रणाम सादर
ओटी भरून मानाची करूया आदर
तिला सदैव सुखी ठेव तू, बाबा साई... ॥३॥
