कामगार
कामगार
1 min
231
दमदार, असतो एक कामगार!!
प्रामाणिक, होतकरू,
जिवाची करतो लाही!
ध्यानी मनी असते,
फक्त, कामकाज!!
दमदार, असतो एक कामगार!!
कंपनीची प्रगती,
हेच त्याचे लक्ष्य!
रात्रंदिवस काम करी,
कुटुंबासाठी!!
दमदार, असतो एक कामगार!!
काम करुनी,
असतो, कायम आंनदी!
सकारात्मक दृष्टिकोन,
ठरतो खूप यशस्वी!!
दमदार, असतो एक कामगार!!
कंपनीसाठी, गाळतो घाम!
मेहनतीचा मिळतो त्यासी दाम!!
निरोगी शरीर, सुखाची झोप!
स्वप्नमाला, पूर्ण होते मग यशपूर्तीची!!
दमदार, असतो एक कामगार!!
सणी पावणी, खातो मिष्टान्न!
मिळालेल्या पैशात, भागवतो परिवार!!
दमदार, असतो एक कामगार!!
