कामाचा डोंगर
कामाचा डोंगर
1 min
345
कामाचा हा,समोर डोंगर
करू कसा मी पार
लावले जरी हात चार
संपतील ना ते फार
एक संपता ,दुसरे हजर
केला यांनी ,पहा कहर
काय धरू ,अन काय सोडू
कंबर माझी कितीक मोडू
चढून चढून पाय शिणले
हिरवळ दिसता मन हरपले
संपता कामे ,मी सुस्तावले
दोन घटका ,मस्त लोळले
आजची कामे आजच केली
घडी उद्याची कुणी पाहिली
