काम करायचे...
काम करायचे...
माहिती-तंत्रज्ञानक्षेत्रातील लोकांनी
घरुन काम करायचे फरमान कंपनीने काढले
बाकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी
व्वा काय मज्जा आहे करत खिल्ली त्याची उडवली
कोरोनामुळे 'सोशल डिस्टंसिंग' हा नवीन शब्द
ज्याच्या त्याच्या तोंडी रूजला
'घरातच बसा सुरक्षित राहा' हा घोषमंत्र
धीर देत सगळ्यांनी एकमेका दिला
हळुहळू घरात प्रत्येक सदस्यांची
गर्दी वाढू लागली
ज्याला त्याला घरातूनच काम करायचेय
आपली स्पेस सांभाळत
पण तारांबळ उडत होती, अॉफिस काम करताना
घरचे काम कधी करणार कोण करणार
जो तो आपला मोबाईल, काॅम्प्युटरवर काम करत होता
जेवण-खाण चहापाणी वेळेवर द्यायला कोणीच नव्हते हाती
अॉफिसमधल्या त्या प्रत्येकाची... सफाई कामगार, सुरक्षा अधिकारी, कॅन्टीन बॉईजची आठवण खूप आली
नेट स्लो, साईट अॅक्सेस, फोन न लागणे
अडचणी चुटशीसरशी सोडवणारे इन्फ्रास्ट्रक्चर स्टाफ डोळ्यासमोर दिसत होता
कधीच त्यांना धन्यवाद दिले नव्हते
त्यांच्या आपल्या आयुष्यातल्या अविभाज्य घटकाला
आज घरातूनच काम करताना आठवण त्यांची झाली
मनापासून धन्यवाद त्यांनाही दिले
विसरत चाललेले स्वावलंबनाचे धडे
परत परत घरात राहून गिरवले!!
