काळ्या आईचा धनी (कविता)
काळ्या आईचा धनी (कविता)
1 min
41.2K
माझ्या काळ्या आईच्या धन्याची
ढगाकडं पाण्याची मागणी
कसा येईना पाऊस
काळ्या आईच्या अंगणी
माझ्या काळ्या आईच्या धन्याची
गुरं लागली मराया
कसा हाकावा संसार
पोरं लागली झुराया
माझ्या काळ्या आईच्या धन्याला
लागली कोणाची नजर
कसा फुटना दुष्काळी ढगाला
पाण्याचा गं पाझर
माझ्या काळ्या आईच्या धन्याला
हुरहूर पोरीच्या लग्नाची
कसा आणावा पैसा अडका
कुणा दारी द्याव्या धडका
माझ्या काळ्या आईच्या धन्याला
शेती नाही पिकाला भात
कसं जगावं जीवन
आता पुरतं टेकलं हात
