काळवेळ
काळवेळ
विचाराविना कृती करु नको,
कृतीविना नुसता विचार नको,
अंड आधी की कोंबडी आधी,
वेळ घालवू नको.
अभ्यासाविना काही बोलू नको,
अभ्यास करुन मौन धरु नको,
ज्ञान घेऊन तसा जाऊ नको,
ज्ञानदान केल्याविना राहू नको.
झोपेशिवाय स्वप्न पाहू नको,
कृतिविना वेळ घालवू नको,
आकाशाला हात देऊ नको,
विनय नम्रता कधी सोडू नको.
झुगार मद्यस्पर्श करु नको,
उपकार सोडून अपकार करु नको
मन धावते,ताबा त्याचा सोडू नको
मत्सर करुन,शरिर जाळू नको.
अनमोल जीवन आहे,
कधी विसरु नको,
रात्रच आहे गडद सारी,
तरी सुर्योदय विसरु नको.
जन्म आहे सत्य, तरी,
मृत्यू विसरु नको.
विवेक सोडून, आचार करु नको,
नितीधर्म सोडून, अनितीने वागू नको,
काळवेळ हाती नाही, कर्तव्य सोडू नको.
