काळोखी अंधार
काळोखी अंधार
1 min
144
कधी अंधार सभोवती
तर कधी उन्हाचा पसारा
एकटाच फिरतोय
या काळोख्या अंधारात
उन्हाचे चटके सोसत
अंधारात शोधतोय
झाकोळलेल्या चांदण्या
आणि त्या मेघांनी झाकोळलेल्या
चांदण्याकडे मागतोय
त्याची शालीनता आणि
तिच्यातला ओलाव्यातला गारवा
आपल्या फुटकळ आसवांना
डोळ्यांतल्या डोळ्यांत साठवत
त्याचवेळी...
काही क्षण सुखाचे न् दुःखाचे
चमकून जातात एखाद्या काजव्यासारखे आणि
दुसऱ्या क्षणाला लपूनही बसतात
त्या अंधाराच्या कपारीत
आताशा हा काळोखी अंधार
आणि हा उन्हाचा पसाराही
सहन होत नाहीयं
क्षणाक्षणांनी पुन्हा पुन्हा
शून्य होत जातोय
हे उन्हाचे चटके आणि
काळोखी अंधार सोसत सोसत
