STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Others

3  

Aniket Kirtiwar

Others

काळोखाला पुसण्यासाठी..

काळोखाला पुसण्यासाठी..

1 min
4.6K


काळोखाला पुसण्यासाठी

त्या वातीचे झिजणे होते

मी पण होतो तिथेच होते

दृष्य ते अती देखणे होते


त्या रात्री झोप मला मुळीच आली नाही

बिछान्यावर मी लोळत होतो

पण माझे मन तिकडे होते

काळोखाला पुसण्यासाठी......


दारे खिडक्या आज घराच्या बंद करू नका हो

प्रकाशास त्या सिमा नव्हत्या

स्वरूप त्याचे अवघे होते

काळोखाला पुसण्यासाठी......


कोण जळले? कोण उजळले?

हिशोब करूया पुन्हा कधी

जे जे आहे ते ते धावे

आईचे मज सांगणे होते


काळोखाला पुसण्यासाठी.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन