STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

3  

SHUBHAM KESARKAR

Others

काळजी

काळजी

1 min
11.2K

काळजी ही घ्यावी म्हणतो

तुमची नाही पण स्वतःची

साखळी ही तोडावी म्हणतो

आपली नाही तर कोरोनाची !! धृ !!


कडवे बोल बोललो असेन

पुढेही ते बोलणार आहे

कारण देशापुढे कोणीही

त्यांच्यापेक्षा मोठे नाही !! १ !!


तुम्ही जर ऐकत नसाल

दोष हा सरकारला देऊ नका

आपल्यातच दोष असतील

ते लोकांसमोर आणू नका !! २ !!


केली नियमांची शिथिलता तरी

पिणे आपले बाकी आहे

दोन महिन्यांची भूक आता

पिण्यानेच उतरत आहे !! ३ !!


कोणती ही भूक म्हणावी

जी राक्षशा परी दिसत आहे

यमलोकी निरोप पाठवण्यास

हेच कारणीभूत ठरत आहे !! ४ !!


कठोर निर्णय घ्या स्वतःकरिता

कुटुंबाकरिता ह्या देशा करिता

पोलिसांकरिता, कामगारांकरिता

डॉक्टरांकरिता, आत्मस्वकीयांकरिता !! ५ !!


सोपे काही समजू नका

सुरवातीचा हा काळ आहे

निर्बंध लावा स्वतःवर 

ह्यापुढे मोठी कसरत आहे


निरोप घेण्यास म्हणतो आता

काळजी घ्या स्वतःची

बाहेरचे जग पाहण्याकरिता

थोडा वेळ बसा आपल्या घराशी !! ६ !!


Rate this content
Log in