STORYMIRROR

Supriya Devkar

Others

4  

Supriya Devkar

Others

काळजी घे

काळजी घे

1 min
927

सोबतीला नाही कोणी 

नको जाऊस भांबावून 

समजाव तुझ्या मनाला 

जाईल सारं निभावून 

विचारांवर ठेव वचक 

नको मनाला भरकटू देवू

भावनांचा होवू दे निचरा 

आसवांना तळहाती घेवू

कसे सांगावे तुला सखे 

तुझी काळजी घे

तुझ्या दुःखासोबत माझ्या 

कुशीत तू ये


साहित्याला गुण द्या
लॉग इन