काळजातील मैत्री
काळजातील मैत्री
तू येता जीवनात माझ्या
माझ्या जगण्याचे अर्थ बदलले
काळजातील मैत्री म्हणजे काय ?
तुझ्या सहवासात ते मला कळाले......
आयुष्यातील कित्येक दिवस
अशीच निघून गेली
माझ्या आतील कलेला सखी
माझ्या पेक्षा जास्त तूच जाणली......
तुझ्या हासण्यातून
माझ्या जीवनाचे हास्य उमलले
माझ्या काव्यातून
आपल्या कालजातील मैत्रीला
शब्दाचे नवे रुप मिळाले.........
तुझ्या सवे स्वप्नांची
घेते मी गगन भरारी
तुझी माझी दोस्ती देते
प्रत्येकाला उत्तर करारी......
तू आहेस सोबत माझ्या
कुणाची हिंमत नाही मला हरवायची
फ़क्त तुलाच हक्क दिले मी
घासातील घास मला भरावायची.......
तुझा क्षणाचाही दुरावा
सहन होत नाही मला
माझ्या काळजाची वाढणारी स्पंदने
बघ आहे आपल्या मैत्रीला पुरावा........
तुझ्या डोळ्यात दिसते
आपल्या नितळ मैत्रीची भावना
सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणात
तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी
हीच काळजातील मैत्री आहे ना....
