कालिया मर्दन
कालिया मर्दन
1 min
337
खेळत होते कृष्ण, सवंगडी
यमुनेच्या तीरी
कासे पितांबर पिवळा
शोभे मोरपीस शिरी //१//
खेळता, खेळता चेंडू
पडला कालिया डोहात
सवंगडी ते कृष्णाला लावती दोष
म्हणे चेंडू का फेकला पाण्यात//२//
कृष्ण प्रभू सरसर चढले झाडावर
विलंब क्षणाचा केला नाही
मारली उडी पाण्यात
डोह कालियाचा होता खोलवर//३//
कालिया नागाचा राग उफाळला
आला चालून प्रभूवर
नाचले कृष्ण कालियाच्या शिरावर
आले यमुना तीरावर //४//
हरवून कालियाला बाळकृष्ण
झाले कालिया मर्दन
तोच दिवस आनंदाने साजरा
होतो नागपंचमीचा सण //५//
