STORYMIRROR

Raakesh More

Others

3  

Raakesh More

Others

काळीज चिरून जाताना

काळीज चिरून जाताना

1 min
247

तुझ्या आठवणींपासून सखे 

दूर निघून जाताना 

वेदना असह्य होतील आता 

काळीज चिरून जाताना ||0||


आठवण देईल तुझी अशी 

प्रत्येक गोष्ट सोडणार मी 

एकटेपणाचं पुन्हा हे 

कफन आता ओढणार मी

मुक्त व्हायचं आहे मला 

मागे फिरून जाताना 

वेदना असह्य होतील आता 

काळीज चिरून जाताना ||1||


किती भावना कवटाळू 

किती आठवणी जाळू 

फिनिक्स झाल्यात आठवणी 

किती मनातून गाळू 

स्मशानशांततेत आता 

पुन्हा विरून जाताना 

वेदना असह्य होतील आता 

काळीज चिरून जाताना ||2||


कोण होतो मी याचा 

तुला फरक पडणार नाही 

हृदयात तूझ्या प्रेम जागेल 

असं कधी घडणार नाही 

विष तूझ्या विरहाचं 

हृदयात जिरून जाताना 

वेदना असह्य होतील आता 

काळीज चिरून जाताना ||3||


Rate this content
Log in