काळी आई
काळी आई
पिकविते काळी आई
सोनं आणि हिरे मोती
गावाकडचा बळीराजा
भरतो धान्याची पोती
ज्वारी बाजरी गहू मका
पिकतोय शेतात हरभरा
डोलतंय झोकात हे रान
सधनसंपन्न हा गाव बरा
पुरवुन पोटाला शेतातला
जगाचा पोशिंदा रानमेवा
नांदती सारेच एकजुटीने
नाहीच कोणामध्ये हेवा
गाळतोय घाम शेतामध्ये
पिकवितो पोटासाठी धन
अविश्रांत कष्ट करूनीही
ठेवतो प्रसन्न आपले मन
अवकाळी येतोच पाऊस
नेतो वाहून पिकही वाहून
होतो हवालदिल शेतकरी
नुकसान आईचे हे पाहून
पडताच गावात दुष्काळ
कर्ज सावकाराचेही डोई
फाशीचा दोरही गळ्यांस
बेचैन होतेच काळी आई
बागायती मळ्यात मिळे
हिरवागारच भाजीपाला
श्रमसाफल्य पोशिंद्याचे
नसावा निसर्गाचा घाला
पुरविती जीवनसत्वे सारी
वांगी भोपळा भेंडी गवार
हरखुन जातोय मळेवाला
फुलून उठते जेव्हा शिवार
फळे फुलेही मिळवून देती
दोन पैसे कष्टाचेच बळीला
शिकविल शाळा मगच तो
आपल्या इवल्या कळीला
