कालच्या सावल्या
कालच्या सावल्या
1 min
275
कालच्या सावल्या
आज अजूनही तिथंच रेंगाळतायत
त्या बंद दाराजवळ
त्यांच दाराच्या फटीतून
एखादी चुकार तिरीप
आत घुसतेय न्
त्यांच तिरीपीतून
काही शब्द टपकतायत
को-या करकरीत कागदावर
त्या कागदाला कदाचित
माहित असावं
एखादं गुपीत अथवा एखादं मर्म
त्या सावलीला कळला असावं दृष्टिकोन
आली असेल जाण भविष्याची
म्हणूनच..
भविष्यातल्या अथांग तरीसुद्धा
अस्वस्थ समुद्रही त्या दाराजवळ
रेंगाळतोय
आणि
को-या करकरीत कागदावर
एखादी भैरवी किंवा विराणी
बनून टपकत असावा
कदाचित ......
