काळ
काळ
1 min
110
होत्याचे नव्हते झाले
आगीत धुमसता सारे
स्वप्नेही जळुन गेली
राखेचे वाहता वारे..
कष्टाने जे जमवलेले
क्षणात सारे संपले
खुप प्रयत्न करुनही
धुळीत सारे गेले
अश्रुंचा पुरही ओसरेना
वेदनेने जीवही होरपळला
असा घातपात बोचरा
क्षणात संसार कोलमडला
उरली धगधग मनात
भितीने रस्ते भिजले
जखम कोरता अपघाताची
काळाचे पाऊल रुजले
