STORYMIRROR

Surekha Nandardhane

Others

2  

Surekha Nandardhane

Others

काल राती सपन पडलं

काल राती सपन पडलं

1 min
51

काल राती सपन पडलं भलतंच न्यार घडलं

सपनामधी सांगून गेला लगीन आपलं ठरलं ।।


सकाळच्या पहारा सपन आठविता जीव माझा धडधडाया

आरश्या समोर रूप न्याहाळता लाज वाटली न बया

कशी सावरू स्वताला मन माझं बावरलं

सपना मधी सांगून गेला लगीन आपलं ठरलं ।।


रंग मेहंदीचा खुलता च गाली चढली पिरतीची लाली

उष्टी हळद अंगा लावता मंगलाष्टके ही कानी पडली

गळ्यात माझ्या सजना नि बांधलं की हो डोरलं

सपना मधी सांगून गेला लगीन आपलं ठरलं ।।


सूर सनई चौघड्याचा आवाज घुमतोय कानी

शृंगार करता खोड्या करतो लबाड माझा धनी

ऐक झलक त्याला पहाया डोळे वाटेकडं लागलं

सपना मधी सांगून गेला लगीन आपलं ठरलं ।।


द्रीष्ट लागण्या जोगे नाते आपले जुडले

निरपेक्ष प्रेमापुढं स्वतःला हरवून बसले

पिरतीच्या वेलीन कस ग बाई गुंफलं

सपना मधी सांगून गेला लगीन आपलं ठरलं ।।


Rate this content
Log in