काळ आणि वेळ फार विचित्र आहे
काळ आणि वेळ फार विचित्र आहे


एक विषाणू रस्त्यावर फिरतोय आणि लोकांचे जीव घेतोय
साता समुद्रापार सर्व अडथळे दूर करत जगावर राज्य करतोय.
प्रत्येक जणसध्याविविध ठिकाणच्या लोकांना संपर्क करतोय
देशा-विदेशात मित्रांशी संवाद साधतोय.
खुशाली आणि परिस्थीतीचा आढावा घेतोय
तुटक्या आशेने निरभ्र आकाशाकडे पाहतोय.
कारण काळ आणि वेळ फार विचित्र आहे. -II-
रस्त्यावरील स्मशान शांतता मानवाचे सामर्थ्यच हरविल्याची कबुली देतेय
उगवणारा प्रत्येक दिवस वाढणाऱ्या आकड्यांच्या बेरजेने मावळतोय.
आपलेच सखे शेजारी एकमेकांकडे संशयाने पाहतायेत
परगावच्या लोकांना जवळून न बघितयल्यासारखे मान वळवून तूच्छ समजतायेत.
मनी नसलेला तिरस्कारही जागा झालाय
शेजारी-पाजारी,आप्त-स्वकीय आणि मित्रही वैरी झालाय.
कारण काळ आणि वेळ फार विचित्र आहे -II-
परिस्थितीने बदलेली संशयाची वादळेही विरतील
आणि हि वेळही निघून जाईल.
मानवाची हि एक अग्नी परीक्षाच आहे
जी त्यानेच केलेल्या चुकीची पावती आहे.
जो ईश्वराला मानतच नाही तो निजकाम आहे
आणि त्याच्या सत्तेशिवाय सर्वकाही निष्काम आहे.
कारण काळ आणि वेळ फार विचित्र आहे -II-