काळ आजचा
काळ आजचा
1 min
425
काळ आजचा, उगम जिथे नव्या युगाचा
अनेक स्पर्धा, असंख्य अडथळे
पार करता करता,
निवांत क्षण भेटता
दिवस तोच सुखाचा...
या काळाचे प्रश्न वेगळे
या काळातील आवाहने वेगळी,.
जिथे तिथे पुढे जाण्याची घाई सगळी...
नवनवीन गॅजेट ने मुले हरखली
जुन्या खेळाला नकळत मुकली,
या काळाच्या तरुण पिढीला
विज्ञानाची भारी आवड ,
प्रश्न हजारो पडता ,
मिळे त्याचे तत्पर उत्तर,
या नव्या युगाला काय सांगावे जुन्या पिढीने?
एका क्लिकवर मिळते त्यांना ज्ञान जगाचे,
प्रश्न नव्या काळातही चालत येतील
पुन्हा जुन्या काळाचे, शोध लागतील पुन्हा नवनवे
,तेंव्हा होईल आजचा काळ निरुत्तर
