काहीतरी हरवलंय
काहीतरी हरवलंय
1 min
718
या आयुष्यात सगळं काही मिळालं
अगदी भरभरून मिळालं
पण जेव्हा तू निघून गेलास तेव्हा
उमगलं काहीतरी हरवलंय
तुझ्यासोबत जगताना सुखाच्या डोहात
मनसोक्त पोहत होती
पण जेव्हा तू निघून गेलास तेव्हा
उमगलं काहीतरी हरवलंय
तुझ्या प्रेमाची बरसात नेहमीच होत होती
माझ्यावर आतापर्यंत
पण जेव्हा तू निघून गेलास तेव्हा
उमगलं काहीतरी हरवलंय
पण आता ती बरसात थांबली होती
तुझ्या आठवणीतच मी चिंब भिजत होती
आता तू निघून गेलास तेव्हा
उमगलं खूप काही हरवलंय
