काहीतरी हरवलंय
काहीतरी हरवलंय
1 min
298
मामाचं पत्र हरवलंय की
पत्र लिहिणारा मामा हरवलाय
एक काहीतरी नक्कीच हरवलंय .....
कोंबड्याचं आरवन थांबल की
सकाळ व्हायची थांबली
एक काहीतरी नक्कीच थांबलयं......
पाटीवर अभ्यास लिहायचा राहिला
की पाटीचं कोरी राहिली
एक काहीतरी नक्कीच राहिलयं.....
मऊ वरण भात करपलाय
की आमची जीभ करपली
एक काहीतरी नक्कीच करपलयं......
संवाद कमी झाला की
विसंवाद वाढला
एक काहीतरी नक्कीच झालयं.....
