काहीबाही
काहीबाही
1 min
504
भावनांची आंदोलनं
विचारांच्या उभ्या आडव्या धाग्याखालून
जाणीवांच्या पलीकडच्या
क्षितिजाच्या ढिगाऱ्यावर नकळतच रेंगाळली
आणि तिथंच स्थिरावली
कधीकाळी याच ढिगाऱ्यावर
तुझे माझे काही मंतरलेले क्षण
आपलं अंधारातलं प्रारब्ध
विखुरलेले श्वास आणि
काही सुखाचे कवडसे
आणि असंच बरंच काही
इथंच कुठंतरी हरवलं होतं
आज पुन्हा सुरूवात करतोय
त्या साऱ्यांना शोधण्याची
या निस्तब्ध एकाकी एकांतात
या क्षितीजाच्या ढिगाऱ्याखाली आणि
ढिगाऱ्यावरसुद्धा
