काही बनायचं असेल तर....
काही बनायचं असेल तर....
1 min
140
काही बनायचंच असेल तर चंद्र बना,
लोक शीतल झाले पाहिजेत तुमची शीतलता पाहून.....
काही बनायचंच असेल ते पाऊस बना,
लोक खुश झाले पाहिजेत तुम्हाला बरसताना पाहून.....
काही बनायचंच असेल तर विनोद बना,
लोक हसले पाहिजेत तुम्हाला ऐकून.....
काही बनायचंच असेल तर समुद्र बना,
लोकांना घाम फुटला पाहीजे तुमची औकात पाहून.....
काही बनायचंच असेल तर एक चांगला अपत्य बना,
लोकांचं सोडा पण आपल्या पाल्यांना अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला पाहून....
