काही आठवणी
काही आठवणी
1 min
65
पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला
साधे घर साधी माणसं कुठे होता बंगला ।।
घर होती साधी पण माणसं होती मायाळू
साधी राहणी चटणी भाकरी खाणारी पण होती श्रद्धाळू ।।
पाहुणा दारात दिसताच खुप आनंद व्हायचा
गप्पा गोष्टी करून शीण निघुन जायचा ।।
श्रीमंती जरी नसली तरी एकटं कधी वाटलं नाही
खिसे फाटके असले तरी काम कोणतं नडलं नाही ।।
नाते गोते घट्ट किंमत होती माणसाला
प्रेमामुळे चव होती अंगणातील फणसाला ।।
सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी कोनी कोणाला बोलत नाही
इंटरनेट ची किमया आता कोणाला वेळच नाही ।।
प्रेम माया आपुलकीचे शब्द आता गावतील का ?
बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे बसतील का?
