कागदावरील शाई
कागदावरील शाई
1 min
193
लेखणीतील शाई उत्सुक, करण्यास कागदावर मुक्त संचार
पण तिचे फिरणे नियंत्रित करतात लेखकाचे त्या क्षणातील विचार
काळ्या, निळ्या, लाल रंगांची शाई जेव्हा कागदावर उमटते
कधी वाचकाला गुदगुल्या करून हसवते
कधी भावूक करून अश्रूंनी कागदाला भिजवते
कधी रूप घेते प्रखर टीकांचे
तर कधी काम करते माहिती पुरवण्याचे
जेव्हा शब्दातून व्यक्त होणारे अर्थ भावनांचे रूप घेतात
तेव्हा लेखकाचे विचार हे वाचकाच्या मनच नाही तर आत्म्यापर्यंत पोहोचवतात
कालांतराने शाईचा रंग उडून जाईल
कागदही जीर्ण होईल किंवा फाटून जाईल
पण आत्म्यापर्यंत पोहोचलेला विचार कायमच अजरामर राहिल
