का ग गेलीस माई तू...
का ग गेलीस माई तू...
1 min
167
आम्ही पुन्हा एकदा
अनाथ झालो ग माई
का? केलीस तू
एवढ्या लवकर जायची घाई
तुझ्या मायेच्या पंखाखाली
आम्ही सर्व घडलो
३३ कोटी देव तुझ्यात दिसले म्हणून
तुझ्याच पायी पडलो
अनाथला तू प्रेम दिलं
पंखात आमच्या बळ भरलं
दिसली तुझ्यात माय म्हणून
तुझ्याच हाताच बोट धरलं
दिलं होतं जन्मदात्रीने कचऱ्यात फेकून
छातीशी कवटाळून तू आपलस केलं
घात केला या क्रूर देवान
आमचं दैवत चोरून नेलं
हरवला आमचा मायेचा महासागर
दैवान असा कसा डाव केला
होता एकुलता एक सहारा
तोही तो घेऊन गेला
