ज्योतिबा
ज्योतिबा
ज्योतिबांनी घडविली सावित्री
शिक्षणाशी करविली तिची मैत्री
स्त्रियांच्या शिक्षणाची ती गंगोत्री
स्त्री मुक्तीची जगाला दिली खात्री
शिक्षणाची ज्योत
सावित्रीच्या हृदयी पेटवली
मुलींची पहिली शाळा
ज्योतिबांनी पुण्यात सुरू केली
ज्योत बनून ज्योतिबांनी
स्त्री शिक्षणाची उजळवली वाट
स्त्री जीवनातील अंधार दूर करूनी
सावित्रीमाईंनी दिला विश्वास दाट
ज्योतिबांनी घडविली सावित्री
शिक्षणाशी करविली तिची मैत्री
स्त्रियांच्या शिक्षणाची ती गंगोत्री
स्त्री मुक्तीची जगाला दिली खात्री
गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड
लेखणीच्या धारेने जागविली माणुसकी
माणूसपण जपून सदा शिक्षणाचे वेड
परंपरेचा मोडून पगडा मांडली माणुसकी
