ज्येष्ठ
ज्येष्ठ
1 min
268
ज्येष्ठ नागरिकांचा
आदर करा
नका करू हेटाळणी
आधार द्या जरा
वय झाले म्हणून
कोणी वयस्कर होत नाही
मनात असते मूल ज्यांच्या
ज्येष्ठ असे मिळत नाही
सन्मान व्हावा त्यांचा
करावा नमस्कार
अनुभवाची शिदोरी
आचरावी जीवनात
जपावे आपल्या वडीलधाऱ्यांना
भोगले त्यांनी कष्ट
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
नाही होत ज्येष्ठ
मिटवू वृद्धाश्रमाचे
सगळे नामोनिशाण
करू सोबत ज्येष्ठांची
बनवू देश महान
