STORYMIRROR

Medha Desai

Others

4  

Medha Desai

Others

ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

1 min
1.3K

जन्माला आलेला प्रत्येक माणूस

ज्येष्ठ नागरिक होणारच असतो

हळूहळू वय वाढत जाऊन

माणूस शरीराने प्रगल्भ होताना दिसतो १


ज्येष्ठ नागरिक अनुभवी असतात

त्यांच्याकडे अनुभवांचा खजिनाच असतो

कष्ट करतच आपले जीवन उभे करून

माणूस आयुष्यात रंग भरताना दिसतो २


प्रत्येकाने साठी नंतरची तरतूद करून

भविष्याची काळजी घेतलेलीच असते

त्याचप्रमाणे एखादा छंद जोपासून

जीवनाची घडी सुरळीत करायची असते ३


तारुण्यातून साठीकडे झुकल्यावर

मुलांचे प्रश्न मार्गी लागलेले असतात

तेव्हा जीवनाची दिशा निश्चित ठरल्यावर

ज्येष्ठ नागरिक निवृत्ती वेतन घेत आनंदी राहतात ४


तरुणांनी ज्येष्ठांच्या समस्या समजून घ्याव्या

मानसिक,शारीरीक क्षमतांचा विचार करावा

त्यांच्याशी सामंजस्याने,आपुलकी, प्रेमाने वागून

त्यांना वृद्धाश्रम नाही दृढविश्वास दाखवावा ५


उतारवयात समवयस्कांबरोबर राहून

माणसाने सुखसमाधानाने जगत रहावे

घरात नातवंडांशी खेळत, मजा करत

स्वतःसाठी तरी सुखाने नेहमी जगावे ६


ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन

स्वतःसाठी विरंगुळा शोधावा

स्वतःमधील क्षमतांचा उपयोग करून

नव्याने जगण्याचा मार्ग धरावा ८


बाल्यावस्था,तारुण्य, वृद्धावस्था 

मानवी जीवनात ठरलेल्या असतात

वयाप्रमाणे प्रत्येकाच्या रंगछटा

आयुष्याच्या वळणावर दिसत राहतात ९


वयपरत्वे ज्येष्ठ नागरिक झाल्यावर

माणसाने स्वतःच स्वतःमध्ये बदल करावे

संसारातून अध्यात्माची कास धरल्यावर

आपोआप जगण्याचे नवसंजीवन माणसाला मिळावे १०


Rate this content
Log in