ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक
आजी अन् आजोबा
असतात आधार कुटूंबाचा
दुधावरच्या सायीप्रमाणे
लाड करतात नातवंडांचा
आई-बाबांना राहत नाही
काळजी मुलांच्या संगोपणाची
आजी जेवू घालताना
सांगते गोष्ट आवडीची
सायंकाळी आजी आजोबा
नेतात बागेत फिरायला
आजोबा चाॕकलेट देतात नेहमी
बाहेरून घरी येताना
संस्काराचे डोस मिळतात
अशाच एकञ कुटूंबात
मुलांनाही चांगली वळनं लागतात
आजी आजोबांच्या सानिध्यात
आजकाल दिसतात असे ज्येष्ठ नागरिक
वृद्धाश्रम नावाच्या गोंडस घरात
आई बाबांना वेळ नसतो
मुलांकडे लक्ष देण्यात
लहान मुलांचे होते संगोपन
पाळणाघराच्या खोलीत
बरे-वाईट होतात संस्कार
अंतर पडते पिढीत
संस्कारक्षम पिढीसाठी
ज्येष्ठ नागरिक हवेच आहेत
प्रत्येक घर राहावे
ज्येष्ठांच्या प्रेमळ छायेत
