ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक
1 min
381
उलटली साठी
हाती आली काठी
कंबरही वाकली
दृष्टीही कमजोर झाली
ज्येष्ठ नागरिकाचा मान
मिळतो समाजात सन्मान
काही ठिकाणी सवलती
तिकीट पडते अर्धी
झालो निवृत्त
हाती वर्तमानपत्र
रिकामा फिरतो सर्वत्र
किंमत नाही काडीमात्र
डोळ्याचे झाले ऑपरेशन
वेळचे उरले नाही बंधन
सरकार देते पेन्शन
तरीही जगणे वाटते टेन्शन
