STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

ज्येष्ठ नागरिक...!

ज्येष्ठ नागरिक...!

1 min
244

ज्येष्ठ म्हणता आठवतात मज

ज्येष्ठातल्या त्या सुंदर गौरी

पाठोपाठ मग धावून येतात

सुंदर सुंदर श्रावणातल्या पोरी...


श्रावण सरींच्या खेळातील

आठवते मज लपाछपी

कधी ऊन तर कधी पाऊस

पाहून खेळत होतो धपाधपी.....


विरले शैषव सरले बालपण

काळ सरकता भराभर

तरुण्यही मग सरता आले

ज्येष्ठत्वाचे नागरिकत्व....


धपाधपीचा हात आता

आशीर्वादासाठी पाठीवर थांबतो

धापा टाकणारा श्वासही आता

क्षणा क्षणात मायेने लीलया चालतो....


सारी माया उफाळून येते

नवपिढीचे कौतुक करण्यास

तेच तेच क्षण आंनदाचे उपभोगता

वेळीही जातो ज्येष्ठत्वाचाआनंदात....


कोणी म्हणतो काका मामा

कोणी म्हणतो द्वाड पणे आजोबा

गाली कळी हस्याची खुलते तिच्या

पाहुनी माझ्या चेहऱ्यावरचा आजूबा....


ज्येष्ठत्वाचे मग निघून जाते

वार्धक्य क्षणार्धात

पुन्हा बालपण परतून येते

वेळ सरता मौलिक तिला पाहुनी आनंदात....!



Rate this content
Log in