जय हो
जय हो
तनी-मनी बहरू दे नव जो
होऊ दे पुलकित रोम-रोम
घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच-उंच......
जयघोष मुखी,
जय भारत -जय हिंद
गर्जु दे आसमंत .......
असंख्यांनी केले त्याग तुजसाठी
अनेकांनी केले बलिदान..........
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण,
वंदन तयांसी करूनी आज
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम....
गाऊ भारतमातेचे गुणगान
उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला.......
देश विविध रंगांचा, देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणारा या एकात्मतेचा....
स्वप्न सगळेच बघतात
स्वतःसाठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी, आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
