STORYMIRROR

Pradip Kasurde

Others

3  

Pradip Kasurde

Others

जय हो संविधान

जय हो संविधान

1 min
466

तोडून भेदाभेद सारे 

दिला आम्हा सन्मान 

माणूस झालो आम्ही 

जय हो संविधान ॥धृ ॥ 


स्वातंत्र्य समता बंधुता 

मूल्य आमचे मानवतेचे 

दर्जा संधी समानता 

सूत्र साधले कल्याणाचे 

अखंड ठेवून या भूमीला 

दिला पहिला मान 

माणूस झालो आम्ही 

जय हो संविधान ॥1॥


अनेक होते भेदाभेद 

साधली यात समानता 

देश रक्षण्या सज्ज आम्ही 

अजोड आमची एकात्मता 

शिल्पकार तू संविधानाचा 

त्रिखंडात तुझी शान 

माणूस झालो आम्ही 

जय हो संविधान ॥2॥

 


Rate this content
Log in