STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

4  

Sarika Jinturkar

Others

जुन्या नव्यातील संघर्ष

जुन्या नव्यातील संघर्ष

2 mins
187

 काळ बदलला, दिवस बदलले

किती बदललं सारं काही ....

साधा पुरेसा वेळ देखील आपल्याला

 एकमेकांसाठी देता येत नाही  


रेडिओवरची गीत माला मनाला देत होती धुंदी  

आता मात्र जिकडेतिकडे डिजेची 

कर्कश, गाण्याची चालते जुगलबंदी  


मोबाईलचा गजर ऐकून दिवसाची सुरुवात होते  

कामाच्या व्यापामुळे देवदर्शनाला 

प्रार्थनेला वेळ क्वचितच मिळते  

पहाटेचा मंद वारा, पक्षांचा किलबिलाट 

कोकिळेच्या मंजुळ आवाज व्हाट्सअप

फेसबुक च्या नादात सगळ्यांना अनुभवायला जमतयं असं नाही  


पूर्वी घर घेताना आधी परिसर बघायचे 

आता नेटवर्क, कव्हरेज आहे का बघतात  

सकाळी उठल्यावर आधी प्रभूनाम स्मरावे 

तर काहीजण चार्जर शोधायला लागतात  

तरुणांच्या गळ्यात आधी लॉकेट चेन असायचे 

आता एअरफोन बघायला मिळतात  


आता दिसतात सर्वत्र उंच उंच इमारती

 पण अशा घरांमध्ये पाहायला मिळत 

नाही मनापासून जपलेली नाती


 स्वयंपाक घरात देखील दिसून येते परिवर्तन  

बदलल्या स्वयंपाक करण्याच्या पद्धती 

 अन्न शिजविण्याचे,बनविण्याचे 

मिळतात आता विविध साधन  


रात्री आकाशात दिसणारा चंद्र,

 चमकणारे तारे किती सुंदर दिसतात 

हे सुद्धा कोणी बघत नाही  

सर्कस मधील जोकर देखील आता 

आपल मन रिजऊ शकत नाही  


टायर घेऊन काठीने पळवणं

विटी दांडू घेऊन इकडे तिकडे मारणं 

लपंडाव खेळत अंगणात बागडणं  

 प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर  

बोर, चिंचा खिशात ठेवून मालामाल होणं

राहिली फक्त त्याची आठवण 

आताच्या मुलांच्या नशिबी आल आहे श्रीमंत बालपण  


कापसाची म्हातारी पकडण्याची मजा ही

राहिली नाही बालपणीचा काळ सुखाचा

स्वतःबरोबर उडत कापसाच्या म्हातारीने

कधी नेला काही कळलच नाही 


 हल्लीच्या काळात फार मोठा बदल झालाय...  

लोक पाकिटात आधी व्हिजिटिंग कार्ड ठेवायचे

 आता एक्स्ट्रा सिम कार्ड ठेवतात 

 इकडच्या-तिकडच्या गप्पा ही आता 

मेसेज व्हिडिओ कॉल वरून रंगतात  


काळ बदलला ...नवीन पिढी जन्माला आली 

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी 

प्रत्येकाची जीवनशैलीच बदलून गेली ... 


खरंच किती अनमोल होता तो काळ 

एकत्र कुटुंबात सोबत व्हायची पहाट 

आता क्वचितच दिसतात एकत्र कुटुंब  

प्रत्येकालाच थाटायचं असतं स्वतःचं स्वतंत्र विश्व  


चालूच राहतो जुन्या-नव्या तील संघर्ष  

मोठे झाले जग मोठ्या झाल्या अपेक्षा  

 जुन्यातून नवीन गोष्टींची 

होते मग परिक्षा

 

अशा कितीतरी गोष्टी... आपल्या दैनंदिन जीवनात

प्रत्येक बदलात घडणारे चांगले-वाईट प्रसंग

अनुभवायला मिळतात मग ती एखादी

वस्तू, गोष्ट असो किंवा गतकालीन आठवण...


अचानक कधीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात 

आणि अलगद उचलून आपल्याला 

त्या सोनेरी दुनियेत घेऊन जातात..  


जगलेल्या क्षणांचे आठवणीत रुपांतर होत जाते

 ते दिवस जगताना कधी मन पुलकित होऊन जाते  

कधी हर्षाचे तरंग उठतात तर कधी 

दुःख वेगाने जीव त्रासून जाते


नजर लागावी इतका आनंद तर जगणे मुश्किल व्हावे इतके दुःख

या सुखदुःखाच्या झोक्यावर जणू मानवी आयुष्य झुलत राहते 

आज जगलेले दिवस सुद्धा कधीतरी जुने होतील

आणि नकळत पुन्हा कधीतरी हे दिवस सोनेरी वाटतील 

जुन्या नव्यातील संघर्ष हा असाचं सुरू राहणार..

 हे आठवणी चे छायाचित्र चांगले चित्रित केले

तरच नंतर बघायला, आठवायला ही मजा येणार ..


Rate this content
Log in