STORYMIRROR

Manda Khandare

Others

3  

Manda Khandare

Others

जुने ते सोने

जुने ते सोने

1 min
553

विचारांच्या विरोधात

करतात खलबत आठवणी. 

सैरावैरा होत ओलांडतात

मनाचा उंबरठा आठवणी. 


होऊन बेफाम फिरतात

तिन्ही लोकात आठवणी. 

येतात परतुन त्याच जुन्या

किनाऱ्यावर आठवणी. 


असे,किती किनारे सरकून गेले

उरल्या लाटांच्या आठवणी. 

*जुने तेच सोने* म्हणत

गहीवरतात मग आठवणी


भातुकलीचा खेळ मांडूनी

रमतात पुन्हा आठवणी

खोल विचारांच्या डोहात बुडूनही

आठवणीत राहतात आठवणी. 


Rate this content
Log in