" जुने कॅलेंडर नवे कॅलेंडर "
" जुने कॅलेंडर नवे कॅलेंडर "
भिंतीवरचे जुने कॅलेंडर उतरले
काही नोंदी आठवून मी रडलो
अन् नवे कॅलेंडर तेथे लागता
नवीन नोंदी करताना हसलो ||१||
कालच्या घटना शिकवून गेल्या
कसे? जगायचे ते सांगून गेल्या
उद्या चे स्वप्न रंगवावे कसे?
जीवनाचे महत्व मांडून गेल्या ||२||
हा प्रवास फक्त एकाच दिसेला
मागे फिरण्याची सुट यात नाही
रोजचा दिवस आयुष्यात नवा
फिरून जुने काहीच मिळत नाही ||३||
आजचे सुख, दुःख आजच्या पुरते
उद्या सांग काय? राहिलं जवळी
कर्म करीत आज फळ मिळे उदयाला
फुकाचा अहं तरी तू का ? कवळी ||४||
वायाच गेले कॅलेंडर कालचे
जरी सांभाळले मी त्याला वर्षभर
नवेच कॅलेंडर फायद्याचे आहे
तरी तू त्याला सांभाळावे वर्षभर ||५||
