जरा विसावू या वळणावर
जरा विसावू या वळणावर
जीवनाच्या रंगमंचावर
अनेक वळणे अनेक वाटा
काही सरळ काही तिरप्या
कुठे सखल तर कुठे उंचवटा
जिवन असे क्षणभंगुर
जगाल तेवढे जगून घ्यावे
आस्वाद घेऊन जीवनाचा
क्षण नि क्षण उपभोगावे
घ्यावी उंच भरारी
चरण मात्र धरेवरी
रंजल्यांच्या सहवासात
घ्यावा विसावा क्षणभरी
दुःख पाहता जवापाडे
सुख पर्वता एवढे
मानून चालावी नवी उक्ती
दुःखातही भासे सुख तेवढे
जीवनाचे ध्येय ठरऊनी
चालत गेले पुढे पुढे मी
नाही पाहिले मागे वळूनी
चालत गेले पुढे पुढे मी
सुख दुःखाची सांगड घालत
चालत गेले पुढे पुढे मी
वळणा वरच्या तिरप्या वाटा
सरळ समजुनी
चालत गेले पुढे पुढे मी
खाच खळगे दुःख अडचणी
संपत आले या वळणावर
जोडीदाराच्या संगतीने
जरा विसावते या वळणावर
जरा विसावते या वळणावर
