STORYMIRROR

Sailee Rane

Others

4  

Sailee Rane

Others

जरा विसावू या वळणावर

जरा विसावू या वळणावर

1 min
774


जरा विसावू या वळणावर

जरा विसावू या वळणावर

खरंय या वळणावर आता विसावण्याची गरज आहे

न जगलेले जिणं जगायची गरज आहे


आयुष्यभर खस्ता खात खातच जगलात

मुलाबाळांसाठी नेहमीच पोटाला चिमटा काढलात

स्वतःच्या तोंडचा घास त्या चिमुकल्यांना देत

आयुष्यभर मात्र स्वतः अर्धपोटीच निजलात


स्वतःच्या आवडीनिवडी कधी पाहिलातच नाही

आणि तुमच्या हिला पण पाहू दिलात नाहीत

पण आता सोडून द्या सारेच विचार

आता जगायचंय ते फक्त आणि फक्त स्वतःसाठीच


भूतकाळात जगणं सोडून द्या आता

भविष्याचीही चिंता नकोय आता

वर्तमानात जगा फक्त आणि फक्त आनंद घेत

आयुष्यातील सुंदर क्षणांचा आस्वाद घेत


तुम्ही म्हणाल या वयात हे शोभते का?

तर हो हे वय तुमचं आहे ,आयुष्य तुमचं आहे

भूतकाळात केलेल्या चुका शोधून स्वतःला दोष देण्यापेक्षा

वर्तमानात आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हसत हसत सामोरे जा


खुशाल करा गप्पागोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींशी

आणि घालवा सारा दिवस आनंदात

जरा विसावा घ्या या वळणावर

जरा विसावा घ्या या वळणावर


Rate this content
Log in