STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

जरा जपून

जरा जपून

1 min
172

इतिहास जमा होत आहे,

खडू आणि फळा,

बदलत्या काळानुसार,

बदल केली तुम्ही शाळा,

समाज घातकी लोक,

 असं घेत नाहीत खपून,

म्हणून सांगतो गुरुजी,

जरा जपून


विद्यार्थी यांच्या भल्यासाठी,

तुम्ही खुप काही केलं,

डिजिटल रंगरंगोटी साठी,

खर्च खिशातुनच करता,

डोमकावळे तुमच्यावरच ,

असतात टपून,

 म्हणून सांगतो गुरुजी,

जरा जपून


लादलेले काम गुरुजी,

हसत हसत करता,

इमानदारीशिवाय शिल्लक,

काय उरतो,

 प्रत्येक काम सरकार,

गुरुजींनाच देतो जपून,

म्हणून सांगतो गुरुजी,

 जरा जपून


कामाची शाळा म्हणून,

नावारुपाला आणली,

आर्थिक घोळ केले म्हणून,

तलवार काढली,

वारे गुरूजी म्हणत,

चौकशी केली कसून,

म्हणून सांगतो गुरुजी,

जरा जपून..... 


Rate this content
Log in