जर तुम्ही असतात तर...
जर तुम्ही असतात तर...
1 min
391
आईबाबा....
जर तुम्ही असता तर...
रस्त्यावर नसतं लागलं फिरावं,
पोटासाठी नसतं लागलं मागावं,
नसतं लागलं झोपावं पायऱ्यावर,
लोकांचा तिरस्कार नसता सोसला वरचेवर.
जर तुम्ही असता तर..
आमच्या कडेही घर असतं,
मायेचं एक छप्पर असतं,
मिळालं असतं पोटभर जेवण,
शाळेसाठी दप्तर असतं.
जर तुम्ही असता तर...
दारोदार हिंडावं लागलं नसतं,
अनाथपण भोगावं लागलं नसतं,
आमचंही जीवन छान छान असतं,
हसतखेळत जगलं लहानपण असतं.
