जो जो रे बाळा जो
जो जो रे बाळा जो
1 min
374
अक्षरसंख्या १० यती ५व्या अक्षरावर
चतुर्थी दिनी , गणेश आला
हिमालयात , जन्म जाहला
माता आनंदी , पुत्रजन्माला
जो जो रे बाळा जो
माता पार्वती , जपे त्याजला
माया लावते , छोट्या तान्हुल्या
प्रेम आईचे , भिजवी त्याला
जो जो रे बाळा जो
दिसामासाने , पुत्र वाढला
चौदा विद्यांत , श्रेष्ठ ठरला
कलांमधेही , प्रवीण झाला
जो जो रे बाळा जो
विद्याधिपती , तोड न त्याला
कार्तिकेयाशी , पैज जिंकला
मोदक भारी , प्रिय त्याजला
जो जो रे बाळा जो