ज्ञानदेवता
ज्ञानदेवता
1 min
352
विद्याधन हे शब्दांचे
ज्ञानाचे अन पावित्र्याचे
पाटीवर अ आ इ गिरवूया
शब्द बनवूया अक्षरांचे...
विद्या हे शस्त्र दुधारी
तळपत्या तलवारीसारखे
म्यानातून काढताच
चालते तेजासारखे....
करूया सारे वंदन
या ज्ञानदेवतेला
आणूया ओठी नाम
नमन या सरस्वतीला....
ज्ञानाचे दीप लावूया
सरस्वतीच्या मंदीरी
उपक्रम प्रकल्पाने
मुलं घडवूया संस्कारी....
