ज्ञानदेवता
ज्ञानदेवता
1 min
165
विद्याधन हे शब्दांचे
ज्ञानाचे अन् पावित्र्याचे
पाटीवर अ आ इ गिरवू या
शब्द बनवू या अक्षरांचे...
विद्या हे शस्त्र दुधारी
तळपत्या तलवारीसारखे
म्यानातून काढताच
चालते तेजासारखे....
करूया सारे वंदन
या ज्ञानदेवतेला
आणूया ओठी नाम
नमन या सरस्वतीला....
ज्ञानाचे दीप लावू या
सरस्वतीच्या मंदिरी
उपक्रम प्रकल्पाने
मुलं घडवू या संस्कारी....
