जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यू
कधी विचार ही केला नव्हता की २२ मार्चसारखा दिवस आयुष्यात येईल
आणि सगळ्यांना घरी बसवेल
एक दिवस कुटुंबासाठी असेल
म्हणाल तर हा दक्षतेचा दिवस पण खूप काही सांगून गेला
डोळ्यात अंजन घालणारा संदेश दिला
त्या दिवशी रस्ते ओस पडलेले
गाड्या ही बंद होत्या
ना गाड्यांच्या धुराचा कुठे वास होता
ना कुठल्या ही रहदारी चा आवाज होता
कोरोना ने असंख्य घेतले बळी
सांगुन ही टाकलं जपा पर्यावरणाला आता तरी
लवकरात लवकर कोरोनाचा असर संपवून दे
हीच प्रार्थना आहे सगळीकडे
जनता कर्फ्यू जर दर महिन्याला एक दिवस पाळला
तर पर्यावरण ही घेईल एक दिवस प्रदुषण नियंत्रण श्वास
