STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

जन्माष्टमी

जन्माष्टमी

1 min
211

माहे श्रावणात । वद्य अष्टमीला

मथुरेत झाला । कृष्ण जन्म ।।१।।


जन्म मथुरेत । गोकुळी सांभाळ 

सोबती गोपाळ । खेळावया ।।२।।


कालिया मारिला । कंस वध केला

दुष्ट पुतनेला । ठार केले ।।३।।


गोप गोपिकांना । एकत्र करून 

कर्तव्य महान । पार केले ।।४।।


कधी ना मानला । जात पात धर्म

जीवनाचे मर्म । सांगितले ।।५।।


दही भात काला । प्रेमे भरविला

खेळ दैवी केला । गोपांसवे ।।६।।


वीर अर्जुनाला । गीता सांगितली

प्रेमाने रचिली । दहीहंडी ।।७।।


Rate this content
Log in