जन्मार्थ
जन्मार्थ
1 min
11.5K
प्रत्येक जण जन्माला येत असतो
काहीना कही तरी करण्यासाठी
देवाने जन्माला घातले आहे
कोणत्या तरी कर्मासाठी
इथ प्रत्येकजण लागलाय
कोणाच्या तरी नादात
इथ प्रत्येकजण फसलाय
कोणाच्या तरी वादात
अशातच कोणतरी म्हणतंय
जगा तुम्ही धर्मासाठी
धर्म म्हणजे काय
हे आम्हाला माहित नाही
रस्त्यावरचा हमाल म्हणतो
आम्ही फिरतो फक्त दिशा दाही
जगतो आहोत आम्ही आमच्या
पोराबाळांच्या पोटासाठी
गीतेमध्ये सागितले आहे
तू कर्म कर त्याचे फळ मिळेल
ठेच लागल्यावरच तुला ते कळेल
नेहमी आपण मरायचं असतं
दुसऱ्यांच्या जगण्यासाठी
