जन्म नाही हा पुन्हा
जन्म नाही हा पुन्हा
1 min
179
हे मानवा विधात्याने जन्म दिला
करू नकोस तू कोणताच गुन्हा
वावर समाजात तू ताठ मानेनं
जन्म हा नाही बर रे पुन्हा,पुन्हा
आईच्या मायेची जाणीव ठेव
बाबांना खुशीतच सदा राहू दे
आजी आजोबांचे पांग सारे फेड
वंशाचा हा दीप उजळता असू दे
जीवनातील सारी सत्कर्म कर
वाईटाला अजिबात नको थारा
समाजात नेहमी उंच मान ठेव
घामाच्या नित्य बरसू दे धारा
कष्टाने पुढे नाव कमव बाळा
हरामाचा पेसा नाही देणार मान
शिकून खूप मोठा मोठा हो अन
कुटुंबाला समाजात मिळूदे स्थान
