जमलेच नाही
जमलेच नाही
1 min
233
कष्टाची भाकरी गोड लागली ,
लुटावे कुणाला कधी जमलेच नाही,
चेहरा स्वच्छ होता,
मुखवटा लावणे जमलेच नाही,
जे लाभले ते आनंदाने स्वीकारले,
कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही,
जीवन साधे सरळ आहे,
भूलथापा मारणे, खोटे बोलणे,
फसवणे जमलेच नाही.
